कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा वाढता आलेख पाहता आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
दिल्ली आणि मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत जवळपास दररोज 100 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तर दिल्लीत दररोज 400 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता कोरोनावरील बूस्टर डोससाठी धोरण निश्चित करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारसह पालिका प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याची सुनावणी 27 एप्रिल रोजी हायकोर्टात होणार आहे. ही याचिका ही याचिका सोमवारी हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली.