Delhi Riots Jahangirpuri Riots Team Lokshahi
ताज्या बातम्या

Delhi Riots : प्रकरणातील 5 जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल

अमित शहा यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Published by : Sudhir Kakde

दिल्ली : राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri Riots) भागात झालेल्या हिंसाचारप्रकरणी गृह मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्या पाच दंगलखोरांवर आता राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अन्सार, सलीम, इमाम शेख उर्फ ​​सोनू, दिलशादी आणि अहिदी यांच्यावर एनएसए अंतर्गत गुन्हादाखल करण्यात आला आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना दंगलखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आणखी 10 संशयितांची ओळख पटवली आहे. या संशयितांच्या शोधात पोलिसांनी दिल्ली आणि आसपासच्या भागांत जवळपास 18 ठिकाणी छापे टाकले आहेत.

गुन्हे शाखेची अनेक पथकं ठिकठिकाणी छापे टाकून संशयितांना पकडत आहेत. पोलिसांनी व्हिडिओद्वारे अनेक संशयितांचे चेहरे ओळखले असून त्यांच्याबद्दल माहिती देखील मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय