ताज्या बातम्या

Delhi Pollution: राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे संकट गंभीर; अनेक भागात AQI 500 पार

दिल्लीतील प्रदूषणाचे संकट गंभीर; अनेक भागात AQI 500 पार, शाळा बंद, सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल

Published by : shweta walge

देशाची राजधानी दिल्लीची हवा विषारी झाली आहे. सोमवारी हवेतील प्रदूषणाची पातळी आपत्कालीन पातळीवर पोहोचली. परिस्थिती पाहता दिल्ली-एनसीआरमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर सरकारी कार्यालयांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

प्रदूषणामुळे मंगळवारी सकाळी अनेक भागात धुके पसरले होते आणि AQI 500 च्या पुढे पोहोचला होता. प्रदूषणामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे. ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा चौथा टप्पा दिल्लीत लागू झाला आहे, तरीही परिस्थिती सुधारत नाहीये. परिस्थिती बिकट होत चालली आहे. दिल्लीतील प्रदूषणाने यंदाचा विक्रम मोडला.

दिल्लीतील लोक पाच वर्षांतील सर्वात वाईट हवेत श्वास घेत आहेत. यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदूषणाची हीच पातळी नोंदवण्यात आली होती. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात AQI पातळी 500 वर पोहोचली आहे.

विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप, बविआ आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले, विरारमध्ये राडा

Latest Marathi News Updates live: विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप

रायगड जिल्ह्यात निवडणुकीची जय्यत तयारी; मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त

BJP Vs Congress | चंद्रपूरच्या कोसंबीत भाजप - काँग्रेसमध्ये मोठा राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

बारामतीत नाट्यमय घडामोडी! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर रात्री सर्च ऑपरेशन