Harassment  team lokshahi
ताज्या बातम्या

हॉट म्हटल्याने संतापली शिक्षिका; आठवीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

विद्यार्थ्याने घरी पोहोचताच गळफास लावून घेतला

Published by : Shubham Tate

Harassment News : उत्तर-पूर्व दिल्लीतील करावल नगर भागात शाळेतून घरी आल्यावर आठवीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला. अभिषेक (१४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेतील शिक्षिकेने त्याचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर, शाळेतील आणखी एका विद्यार्थ्याने आरोप केला होता की, अभिषेकने शाळेतील एका महिला शिक्षिकेला हॉट म्हटले होते. याप्रकरणी त्याला व त्याच्या कुटुंबीयांना शाळेत बोलावून समज देण्यात आला होता. (delhi ncr class 8th student hanged himself in karawal nagar woman teacher accused of harassing him)

अभिषेकचा जबरदस्तीने टीसी कापल्याची चर्चा होती. त्यानंतर त्याला कोणत्याही शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले. यानंतर विद्यार्थ्याने घरी पोहोचून आपल्या खोलीत गळफास लावून घेतला. शिक्षकेच्या छळाला कंटाळून अभिषेकने गळफास घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक कुटुंबासोबत जोहरीपूर, करावल नगर परिसरात राहत होता. त्यांच्या पश्चात वडील अशोक कुमार, आई सुनीता, मोठा भाऊ विवेक आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. अशोक कुमार खाजगी नोकरी करतात. अभिषेक हा जवळच्याच सरकारी शाळेत आठवीचा विद्यार्थी होता.

अशोकने सांगितले की, 3 जून रोजी अभिषेकच्या स्कूलमधून फोन आला. अभिषेकबाबत तक्रार करत शिक्षकाने कुटुंबीयांना शाळेत येऊन भेटण्यास सांगितले. सकाळी ९.०० वाजता फोन आला. 10 वाजता अभिषेक भाऊ विवेकसोबत शाळेत पोहोचला.

शिक्षकाने आधी अभिषेकच्या भावाला आरोप करून माफीनामा लिहायला लावला. यानंतर त्यांनी अभिषेकचे नाव कापून टीसी देण्यास सांगितले. नाव वजा केल्यानंतर त्यांचा प्रवेश कुठेच होणार नसल्याचेही या शिक्षकाने सांगितले. यानंतर विवेक आणि अभिषेक घरी आले.

घरी पोहोचल्यानंतर अभिषेकने दैनंदिन काम केले. यानंतर तो दुसऱ्या मजल्यावरील त्याच्या खोलीत पोहोचला. काही वेळातच अभिषेक कपाटाच्या पाईपला ओढणीच्या सहाय्याने लटकलेला दिसला. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण