भारताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीतून काही तरी बातमी समोर येत असते. दिल्लीत अनेक घटना घटताना दिसून येतात. तर दिल्लीत भूकंपाचे संकेत मिळाले असून, आता राजधानी दिल्लीसह उत्तर भारत देखील भूकंपाने हादरला आहे. भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल असून पाकिस्तानातील करोरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं समोर आलं आहे. तसेच उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणाला भूकंपाचे धक्के बसल्याचे समोर आलं आहे. तर पंजाब, जम्मू काश्मीरलाही भूकंपाचे धक्के बसले आहेत.
पाकिस्तानात देखील 5.8 रिश्टर भूकंपाचे धक्के आहेत, तर दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले बुधवारी पाकिस्तानात 5.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर संपूर्ण दिल्ली आणि उत्तर भारताच्या बहुतांश भागात भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले. इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील करोरपासून 25 किमी दक्षिण-पश्चिमेला असून भूकंपाची खोली 33 किमी होती. तर अफगाणिस्तानलाही अचानक झालेल्या भूकंपाचा धक्का बसला.