नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे पतधोरण आज जाहीर झाले आहे. रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी घोषणा केली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.
रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. यामुळे 0.50 टक्क्यांनी व्याजदर वाढले आहेत. आजच्या वाढीसह आरबीआयने मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. पूर्वी ते 5.40 होता. शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीचा धक्का आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक मध्यवर्ती बँकांच्या आर्थिक धोरणांमुळे व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाई उच्चांकावर असून त्यात अजून भर पडली आहे.