झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला.
फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याची माहिती मिळत असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.