समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बांगलादेशातील धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. चेन्नईत ड्युटीवर असताना ही धमकी आल्याचे समजते. चेन्नईत ड्यूटीवर असताना बांगलादेशी धार्मिक कट्टरपंथीयांकडून कॉल आणि मेसेजद्वारे धमकी देण्यात आल्याचे वानखेडे यांनी सांगितले. तसा ई-मेल त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि गोरेगाव पोलीस ठाण्याला पाठवला आहे.