नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला.
तसेच 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जात 12 बालकांचा देखील समावेश होता. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामाजी टोंपे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिलीय. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडलं. तसंच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसेही खर्च करावे लागले. अधिष्ठाता डॉक्टर एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी उपचाराकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.