आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डाची गरज आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागते. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने आता ते मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. आता मात्र पुन्हा एकदा 14 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
सरकार अधिकाधिक लोकांना त्यांची आधार कागदपत्रे अपडेट करण्यासाठी अतिरिक्त तीन महिन्यांची मुदत देत आहे आणि हे काम आता 14 डिसेंबरपर्यंत My Aadhaar पोर्टलद्वारे विनामूल्य अपडेट केलं जाऊ शकतं.