ताज्या बातम्या

India Vs South Africa : मिलरच्या फटकेबाजीमुळं भारताचा पराभव, विश्वविक्रमाचं स्वप्न भंगलं

Published by : Team Lokshahi

साऊथ अफ्रिका विरुद्ध भारत या सामन्यात आज भारताचा आज दारुन पराभव झाला आहे. साऊथ अफ्रिकेनं भारताला 7 विकेटनं पराभूत केलं. क्विंटन डीकॉकच्या संघानं वृषभ पंतच्या टीमला तब्बल 7 गडी राखून हरवलं आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला T20 सामन्यात आज भारताला मोठा पत्करावा लागला आहे. रॅसी व्हॅन डर डसेन आणि डेव्हिड मिलर यांनी प्रत्येकी 75 आणि 64 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेनं गुरुवारी अरुण जेटली स्टेडियमवर पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारताविरुद्ध 212 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली आणि या दोघांनी लगातार चौकार लगावले. भारतीय गोलंदाजांना या तुफान फटकेबाजीचा सामना करता आला नाही. शेवटी, प्रोटीजने 5 चेंडू बाकी असताना सात विकेट्सने आरामात विजय मिळवला. तत्पूर्वी, भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. इशान किशनच्या शानदार पॉवर हिटिंगमुळे यजमानांना मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. मात्र तो 48 चेंडूत 76 धावांवर बाद झाला.

भारताचे शेवटचे 13 T20 आंतरराष्ट्रीय सामने

1. अफगाणिस्तान विरुद्धचा सामना - विजय (कर्णधार- विराट कोहली)

2. स्कॉटलंड विरुद्धचा सामना- विजय (कर्णधार- विराट कोहली)

3. नामिबिया विरुद्धचा सामना - विजय (कर्णधार - विराट कोहली)

4. न्यूझीलंड विरुद्धचा सामना - विजय (कर्णधार- रोहित शर्मा)

5. न्यूझीलंड विरुद्धचा सामना - विजय (कर्णधार- रोहित शर्मा)

6. न्यूझीलंड विरुद्धचा सामना- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)

7. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना - विजय (कर्णधार - रोहित शर्मा)

8. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना - विजय (कर्णधार - रोहित शर्मा)

9. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना- विजय (कर्णधार - रोहित शर्मा)

10. श्रीलंका विरुद्धचा सामना- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)

11. श्रीलंका विरुद्धचा सामना- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)

12. श्रीलंका विरुद्धचा सामना- विजय (कर्णधार- रोहित शर्मा)

13. दक्षिण आफ्रिका विरुद्धचा सामना - पराभव (कर्णधार - ऋषभ पंत)

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news