ताज्या बातम्या

ठाकरे गटाला झटका! 'त्या' विधानाप्रकरणी माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला झटका बसला असून एकच खळबळ उडाली आहे.

सकाळी 8 वाजता पोलिसांनी दत्ता दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातूनअटक करण्यात आली. दळवी यांना भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दळवी यांना अटक झाल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. दळवी यांना अटक झाल्याची माहिती मिळताच भांडूप पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे.

रविवारी भांडूपध्ये ठाकरे गटाने कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. राजस्थानमधील प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुह्रदयसम्राट’ अशी उपमा लावण्यात आली होती. त्यामुळे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली होती. दळवी यांचीही अर्वाच्य भाषा शिंदे गटाला चांगलीच झोंबली होती. त्यामुळे शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलिस ठाण्यात दळवी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. सार्वजनिक सभेत संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दिली होती.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती