सत्ताधारी आणि विरोध नेहमी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. दादा भुसे यांनी गिरणा बचाओ समितीच्या माध्यमातून गिरणी शुगर अॅण्ड एलाइड इंडस्ट्रीज लि.ची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांकडून लाखो रुपये गोळा केले.कंपनीच्या संकेतस्थळावर केवळ ४७ मुख्य शेअरधारकांची नोंद आहे. यांच्याकडून १६ कोटी २१ लाख, ८ हजार ८०० रुपये शेअर्सची रक्कम एकत्र केली आहे. परंतु तरीही दादा भुसे गिरणी सहकारी चिनी मिलला वाचवू शकले नाही. उलट शेतकरी आणि शेअर्सधारकांची फसवणूक केली. असे म्हणत त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी ट्विट केले आहे की, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.असे राऊतांनी म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर विधासभेत दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा भुसे म्हणाले की, संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवारांची चाकरी करतात असे म्हणाले. आमच्या मतांवर निवडून आलेले महागद्दार असे म्हणत दादा भुसेंनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. माझे विरोधी पक्षनेते आणि सरकारला आवाहन आहे की माझी कुठल्याही संस्थेमार्फत चौकशी करावी. दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन अन्यथा त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. माझ्यावर चुकीचे आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. असे दादा भुसे म्हणाले.