रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकले असल्याची माहिती मिळत आहे. वादळाची तीव्रता ताशी 110 ते 120 किलोमीटर असल्याची माहिती आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनेक शहरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वादळामुळे बंगाल, त्रिपुरा आणि ओडिशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. SDRF, NDRF चे जवान सज्ज झाले आहेत. रेमल चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.