पश्चिम बंगालवर धडकलेल्या 'दाना' चक्रीवादळामुळे हाहाकार उडाला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये हवामान प्रचंड खराब आहे. पश्चिम बंगालला धडकलेल्या 'दाना' या चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यभरात ढगाळ व थंड वातावरण राहणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात, कोकणात व राज्यात पावसाची शक्यता आहे. 15 नोव्हेंबरनंतर थंडीचे वातावरण तयार होईल. अशी माहिती मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत राज्यासह मुंबईत थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली असून या 'दाना' या चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार आहे.
ओडिशात सध्या ताशी 110 ते 120 किमी वेगाने जोरदार वारे वाहत असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून काही उड्डाणे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुळसाधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत असून नागरिकांना सुरस्थितस्थळी हलवण्यात आले आहे.