ताज्या बातम्या

Cyclone Dana : ओडिशामध्ये दाना वादळांचं भयानक संकट; ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट

दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल, ओडिसाच्या दिशेने, चक्रीवादळ उद्या पहाटे किनारपट्टीला धडकणार, 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Published by : shweta walge

ओडिशामध्ये दाना वादळांचं भयानक संकट आलय. ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलय. बालेश्वर, केंद्रापाडा, भगतपूर, कटक, पुरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची महिती आहे. धामरा बंदराजवळ वादळ जमिनीवर येणार. मध्यरात्री २ दरम्यान १०० ते १५० वेगानं वारं धडकणार.

४ ते ५ लाख नागरिकांचं स्थलांतर पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशा सरकारनं तयार केली वादळ आश्रय घरं. ओडिशा आणि प. बंगालमध्ये जाणाऱ्या बहुतांश विमानसेवा बाधित.

अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. आज वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये हवामान प्रचंड खराब आहे. सध्या चक्रीवादळाने अंदमानचा समुद्र सोडला असल्याने केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळाचा परिणाम कमी झाला आहे. मात्र सध्या हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीत आहे. आज सकाळी हे वादळ ओडिशा मध्ये पुरीच्या समुद्रकिनारी धडकू शकतं. वादळाच्या प्रभावामुळे ओडिशात ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. उद्या वादळ किनारपट्टीजवळ धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने रहिवासी आणि पर्यटकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. तसेच, स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरातच राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news