बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला जाणवेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील 24 तासांत अंदमान समुद्रावरील हवेच्या चक्रीवादळाचे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 23 ते 25 ऑक्टोबरदरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मच्छिमारांना 21 ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 23 ऑक्टोबरपासून ओडिशाच्या काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असल्याची माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. किनारपट्टीवरील काही भागांत 24-25 ऑक्टोबरला 20 सें.मी. तर काही ठिकाणी 30 सें.मी. पाऊस, तर काही ठिकाणी 30 से.मी.पेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचे ते म्हणाले. यामुळे पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.