Cyclone Biparjoy : गुजरातवर बिपरजॉय वादळाचे संकट घोंगावत होते. बिपरजॉयमुळे गुजरातला हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच आता अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातनंतर आता राजस्थानकडे सरकलं आहे.
येथील वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात तसेच शेजारील महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
गुजरातनंतर चक्रीवादळ राजस्थानकडे पुढे सरकत आहे. या भागातही चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमध्ये अधूनमधून पाऊस सुरु आहे.