भूपेश बारंगे, वर्धा: जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव, एलो मोझ्याक आणि बुरशीजन्य रोग आख्याने सोयाबीन पिके पिवळी पडत आहे. शेतकऱ्यावर एकावर एक संकट ओढवत असताना कृषी विभाग मात्र बैठकांमध्ये मध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे बघावं, शेतकऱ्याचं वाली कोण? असा प्रश्न शेतकरी करत आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सोयाबीन पिके पिवळी पडत असताना सोयाबीनच्या शेंगा भरल्या गेल्या नाही. तर सोयाबीन पानांवर अळ्यानी हल्ला केला आहे. सोयाबीन पिके अवघ्या काही दिवसात वाळायला सुरुवात झाली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं होतं. यावर्षी चांगलं उत्पन्न होईल अशी आशा असताना निसर्गाच्या बदलत्या वाटवरणामूळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवल आहे.
जिल्ह्यात या खरीप हंगामात 1 लाख 26 हजार 651 हेक्टर मध्ये सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली. पाऊस उशिरा आल्याने कुठे दुबार पेरणी देखील झाली. कसेबसे पीक उगवले, पिके हिरवी दिसायला लागली असतानाच पिक चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आर्वी, आष्टी ,कारंजा, देवळी, सेलू, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात सोयाबीन अचानक पिवळे पडायला लागले. नेमके पीक पिवळे का पडते आहे. यावर सेलसुरा येथील कृषी तज्ञानी पाहणी करून सल्ला दिला. पण हा सल्ला देखील शेतकऱ्यांच्या उपयोगाचा ठरला नाही. एकामागोमाग एक असे हजारो हेक्टर वरचे पीक पिवळे पडले आहे. येलो मोझ्याक सारखा रोग शेती फस्त करीत आहे. तर दुसरीकडे आर्वी ,आष्टी, कारंजा परिसरात बुरशीजन्य रोगाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. यावर उपाय काय? पंचनामे किती झाले, सर्वेक्षण कसे झाले आणि कृषी विभागाचा अहवाल काय याबाबत कृषी विभागातील अधिकारी बोलायला तयार नाही. प्रतिक्रिया देण्यासाठी अधिकारी उपलब्ध होत नाही. आपण बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे.
आमदार शेतकऱ्याच्या बांधावर,कृषी विभाग कार्यालयात व्यस्त
जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर नुकसान असताना आमदार दादाराव केचे बांधावर जाऊन सोयाबीन पिकांचे पाहणी केली जात कृषी विभागाला पंचनामा करण्यासाठी आव्हान करत असून शेतकऱ्यांना तातडीने सरकारने हेक्टरी 50 हजाराची मदत करावी अशी मागणी केली आहे. यातून शेतकऱ्याचं समाधान केले जात आहे.मात्र कृषी विभागाचे अधिकारी कार्यलयात व्यस्त असल्याचे दर्शवत आहे.कृषी अधीक्षकांना भ्रमणध्वनी केली असता मिटिंग मध्ये व्यस्त असल्याचे सांगून वेळ मारून देत ,सोयाबीन पिकांवर गेलेल्या रोगावर बोलायला तयार नसल्याचे दिसून आले.