महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हत्या, अत्याचार, हिट अँड रन, लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलाय. त्यातच राजकीय नेत्यांच्याही हत्येच्या घटना समोर आल्यात. सिद्दिकी यांच्याआधी महाराष्ट्रात दोन बड्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती.
मुंबईतल्या वांद्रेमध्ये वर्दळीच्या ठिकाणी, सत्ताधारी नेते बाबा सिद्दीक्कींची हत्या झाल्यानं, राजकीय वर्तुळ ढवळून निघालंय. बाबा सिद्दिकी यांच्याआधी महाराष्ट्रात दोन बड्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या झालेली आहे. या दोन्ही नेत्यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. कामगार नेते डॉ. दत्ता सामंत आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांचीही हत्या झाली होती. 2024 सालातल्या 10 महिन्यात महाराष्ट्रात 4 राजकीय नेत्यांची हत्या झाल्या आहेत.
10 महिन्यात महाराष्ट्रात 4 राजकीय नेत्यांची हत्या
1) 8 फेब्रुवारी 2024- मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्ह करतानाच गोळीबार करून हत्या
घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडल्या, घोसाळकरांचा मृत्यू झाला. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार करून आत्महत्या केली.
2) 1 सप्टेंबर 2024- पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याचे वार करत हल्ला
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपचारादरम्यान मृत्यू
3) भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या
सचिन कुर्मा यांच्यावर भायखळामधील म्हाडा कॉलनीत धारदार शस्त्राने हल्ला
4) 12 ऑक्टोबर 2024- वांद्रे पूर्वच्या खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळीबार करुन हत्या
वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.