crime Team Lokshahi
ताज्या बातम्या

Crime | आपली मुलगी बॉयफ्रेंडशी बोलत असल्याने पित्याकडून मुलीचा खून

बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातील धक्कदायक प्रकार

Published by : Team Lokshahi

बिहार (Bihar) राज्यातल्या दरभंगा जिल्ह्यात एक २० वर्षाची प्रेयसी प्रियंकारसोबत फोनवर बोलत होती म्हणून तिच्या वडिलांनी निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला आहे. उस्मान (Usman) नावाच्या इसमाने आपली २० वर्षांची मुलगी सतत फोनवर तिच्या प्रियकरासोबत बोलते ही बाब सहन न झाल्याने तिचा खून करून मुलीचा मृतदेह नदीत फेकून दिला.

बिहारमधले हे प्रकरण असून मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल (Audio viral) झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हा व्हायरल झालेलं ऑडिओ मृत मुलीच्या आई , मामा आणि बहिणीने पुरावा म्हणून पोलिसांना दिल्याने आरोपी उस्मानला अटक करण्यात आलेली आहे. बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातील मोरो पोलीस ठाण्याच्या (Moro Police Station) हद्दीतील रतनपुरा (Ratanpura) गावची ही घटना असून मुलीच्या बापानेच अशाप्रकारे मुलीचा खून केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

मुलीच्या वडिलाने आपल्या वीस वर्षांच्या मुलीचे लग्न तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका मुलासोबत ठरवले होते. या मुलीचे नाव आफरीन (Aafreen) असे असून तिचे लग्न ठरवण्याआधीच तिचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. उस्मानने आपल्या मुलीला या आधीच्या प्रियकरासोबत बोलण्यास मनाई केली होती, पण तरीसुद्धा आपली मुलगी जुन्या प्रियकराशी बोलत असल्याचे उस्मानच्या लक्षात आले होते. एकेदिवशी आफरिन लपून प्रियकराशी बोलत होती आणि यावेळी तिचे वडील उस्मान तिथे आले आणि आपली मुलगी आपल्या मनाविरुद्ध प्रियकराशी बोलत आहे हे पाहून तो संतापला आणि मुलीला मारहाण करून तिथेच त्याने तिचा खून केला. १५ मेला ही घटना घडल्याची माहिती आहे. मुलीचा खून करून या निर्दयी बापाने मुलीचा मृतदेह नदीत फेकून दिला आणि दुसऱ्या दिवशी आपली मुलगी हरवल्याची कांगावा केला. मात्र मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली होती.

हत्येचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर बापानेच मुलीचा खून केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...