Nana Patole 
ताज्या बातम्या

Lokshahi Impact: अटल सेतूच्या पुलाला पडल्या भेगा! नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, MMRDA ने केला खुलासा

अटल सेतूच्या पुलाला भेगा पडल्या असून रस्त्याची दुरवस्था झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीटरवर दिली आहे.

Published by : Naresh Shende

मुंबई आणि नवी मुंबईला समुद्रमार्गे जोडणाऱ्या अटल सेतुचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. १८ हजार कोटींचा या प्रकल्पाचा अनावरण सोहळा मोदी सरकारने मोठ्या थाटामाटात केला होता. परंतु, या अटल सेतूच्या पुलाला भेगा पडल्या असून रस्त्याची दुरवस्था झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीटरवर दिली आहे. यासंदर्भात लोकशाहीनं वृत्त प्रसारित केल्यानंतर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने तातडीनं याबाबत खुलासा केला आहे.

नाना पटोले ट्वीटरवर काय म्हणाले?

प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या "अटल सेतू" पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार मध्ये नवनिर्मित पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत या पुलाची पाहणी केली. सदर बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. यावेळी समवेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते श्री. मदन जाधव, सचिव श्री. रमाकांत म्हात्रे, श्री. रामविजय बुरुंगुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकशाहीच्या बातमीनंतर अटल सेतूबाबात एमएमआरडीएने केला खुलासा

अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नाही. विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. प्राथमिक तपासादरम्यान अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा अढळून आल्या. हा पोहाच मार्ग मुख्य पुलाच्या भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नसून नैसर्गिक बाबींमुळे उत्पन्न झाल्या आहेत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही. उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ५ च्या कडांवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज ४ चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले. सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता २४ तासांत हे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे प्रकल्प अधिकारी कैलाश गणत्रा यांनी दिली.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड