Admin
ताज्या बातम्या

कोरोनाने चिंता वाढवली; देशात 24 तासांत 10,000 हून अधिक रुग्णांची नोंद

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 10,158 नवीन प्रकरणं प्राप्त झाल्यामुळं देशात सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे.

देशात एका दिवसांत कोरोना विषाणूचे 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 4,42,10,127 च्या वर गेली आहे. कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.

कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...