चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट झाले असून कोविड प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत. भारतातही सर्व राज्यांना कोरोना अॅडव्हायजरी जारी केली आहे.चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व महत्वांच्या रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. रुग्णालयांमधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.सर्व शासकीय रुग्णालयांना तयार राहण्याचे संकेत मिळालेले आहे. आज संपूर्ण देशात रुग्णालयातील तयारीचा आढावा घेऊन मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. अत्यावस्थ कोविड रुग्ण रुग्णालयात आला तर कशाप्रकारे हाताळणी करायची, आवश्यक मनुष्यबळ , औषधे , ऑक्सिजन इत्यादी बाबी तयार आहेत किंवा नाही हे यावेळी तपासण्यात येणार आहे.
देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी पूर्वी कोविड सेंटर होते तिथे गॅस प्लान्टपासून ते डॉक्टर, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर, कॉन्सेंट्रेटर या सारख्या सुविधांची व्यवस्था करणे, त्यानंतर त्याची माहिती केंद्र सरकारला द्या. जर कोरोनाची परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यास तर वैद्यकीय महविद्यालयात रुग्णालय सुरू करता येईल अशी व्यवस्था करा. असे आरोग्य विभागाकडून लिहिलेल्या पत्रातून सांगितले आहे.