कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीत कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आजपासून या मॉक ड्रिल सुरुवात होणार आहे.
रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या रुग्णालयात आहे की नाही? याची तपासणी केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया मॉकड्रिलची पाहणी करण्यासाठी झज्जरच्या एम्स रूग्णालयात उपस्थित राहणार आहेत. मुंबईत आज सकाळी 11 वाजता जे. जे. रुग्णालयात, दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार असल्याची माहिती मिळत आहे.