Ravindra Dhangekar 
ताज्या बातम्या

"जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय, तो कसा कुणावर कारवाई करणार..."; रवींद्र धंगेकरांच्या ट्वीटमुळे खळबळ

Published by : Naresh Shende

Ravindra Dhangekar Tweet : बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून पुण्यातील कल्याणी नगरमध्ये दोन जणांचा बळी घेतला. पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी पक्ष आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात उडी घेतली असून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. धंगेकरांनी ट्वीटच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्वीटरवर काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार...? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.

दिवस १ला - मुंढवा पोलीस स्टेशन

हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात. त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात.

सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन.

जय हिंद ,जय पुणेकर..!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू