मुंबईतील मविआच्या जागावाटपावरून काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड नाराज असल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज वर्षा गायकवाड दिल्लीला जाणार होत्या. मात्र आता वर्षा गायकवाड दिल्लीला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आज आम्ही दिल्लीला जाणार होतो. परंतु आदरणीय मल्लिकार्जुन खर्गे साहेबजी हे गुलबर्गाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांची वेळ मिळाली नाही आहे. त्यांची वेळ मिळाल्यावर आम्ही नक्कीच भेट घेऊ.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, महाविकास आघाडीमधून म्हणून कामाला सुरुवात देखील आम्ही करु. सहाच्या सहा सीटांवर महाविकास आघाडीचे कसे निवडून येतील यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने पूर्णपणे सहकार्य केलं जाईल.