आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आपल्या संगमनेरमधील जोर्वे गावामध्ये जाऊन त्यांनी मतदान केले आहे.
मतदान केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाचा दृष्टीने हा लोकशाहीचा उत्सव असतो. तो तितक्याचे निष्ठेने आणि आनंदाने साजरा केला पाहिजे. हा चौथा टप्पा महाराष्ट्रातला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, देशाचासुद्धा चौथा टप्पा आहे. लवकरच सर्व मतदानाचे टप्पे पूर्ण होतील आणि 4 तारखेला नवीन सरकार बनणार आहे. अपेक्षा आहे की पुढील सरकार लोकशाहीला जपणारे, राज्यघटनेला जपणारे आणि देशाला पुढे नेणारं असं असावं. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.