ताज्या बातम्या

'त्रिमूर्ती'ने केला शेतकरी संघटनेचा 'गेम'...तब्बल वीस वर्षानंतर काँग्रेसने -भाजप युतीने मिळविली सत्ता..!

18 पैकी 14 जागांवर काँग्रेस- भाजप युती,एक अपक्ष तर तीन शेतकरी संघटना.

Published by : shweta walge

अनिल ठाकर, चंद्रपूर; नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस भाजप युतीने दणदणीत विजय प्राप्त केला. आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडलेल्या मतमोजणीत18 पैकी 14 जागांवर काँग्रेस भाजप युतीने स्पष्ट बहुमत प्राप्त करीत शेतकरी संघटनेचे बालेकिल्ला उध्वस्त केला. तब्बल वीस वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस भाजप युतीला दणदणीत विजय मिळवता आला. एकूण 18 जागांपैकी काँग्रेस भाजप युतीने 14 जागा प्राप्त केल्या. एक अपक्ष आहे ,तर शेतकरी संघटनेला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. पहिल्यांदाच आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ऍडव्होकेट संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी एकत्र येऊन शेतकरी संघटनेचा 'गेम' केला. व एका मंचावर येवून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. व शेतकरी हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्य करेल असे आश्वासन दिले.

निवडणुकीतील निकालानंतर शेतकरी संघटनेचे तब्बल वीस वर्षापासून असलेले वर्चस्व संपुष्टात आले आहे. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वात एक हाती सत्ता होती मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता उध्वस्त करण्यासाठी आजी व माजी आमदाराने युती करून शेतकरी संघटनेचा विधानसभेतील राजकारणात सफाया केला. काँग्रेस भाजप युतीने राजुरा विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेच्या ताब्यात असलेल्या एकमेव कृषी उत्पन्न बाजार समितीवरील वर्चस्व संपुष्टात आणले. राजकारणातील प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांना पाहण्यात पाहणारे काँग्रेस आणि भाजप युतीच्या रणनीतीने येणाऱ्या स्थानिक निवडणुकात मतदारांसमोर एक वेगळा पर्याय समोर आणला आहे. या निवडणुकीतील निकालामुळे शेतकरी संघटनेला जबरदस्त फटका बसलेला आहे तर काँग्रेसने भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवलेले आहेत.

- सेवा सहकारी मतदार संघातून सात पैकी सहा उमेदवार काँग्रेस भाजप युतीचे विजयी झाले. यात ऍड.अरुण धोटे, उमाकांत धांडे, विनोद झाडे, सतीश कोमरवेलीवार, संजय पावडे, आशिष नलगे,तर शेतकरी संघटना समर्थित पॅनेलचे प्रफुल कावळे विजयी झाले

- सेवा सहकारी संस्था (महिला) मतदारसंघातून काँग्रेस भाजप युतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले .यात सरिता रेड्डी विठाबाई झाडे विजयी झाले.

- सेवा सहकारी संस्था मतदार संघ (इतर मागासवर्गीय) गटातून शेतकरी संघटनेचे प्रभाकर ढवस विजयी झाले.

- सेवा सहकारी संस्था मतदार संघ (विमुक्त जाती/ भटक्या जमाती गट) यामधून काँग्रेस भाजप युतीचे तिरुपती इंदूरवार विजयी झाले.

- ग्रामपंचायत मतदार संघातून (सर्वसाधारण गटामध्ये )काँग्रेस भाजप युतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले यात जगदीश्वर बुटले, राकेश हिंगाने हे विजयी झाले

- ग्रामपंचायत मतदार संघ (अनुसूचित जाती /जमाती ) मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे दिलीप देठे विजयी झाले.

- ग्रामपंचायत मतदार संघ (आर्थिक दुर्बल घटकातून) काँग्रेस भाजप युतीचे विकास देवाडकर हे अविरोध निवडून आले.अडते व व्यापारी मतदार संघातून अपक्ष उमेदवार गोपाळ झंवर विजयी झाले.तर काँग्रेस भाजप युतीचे नवनाथ पिंगे हे ईश्वर चिट्ठीने ते विजयी झाले.

- हमाल व मापारी मतदारसंघातून काँग्रेस भाजप युतीचे लहू बोंडे,हे ईश्वरचिट्टीने विजयी झाले.

- सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आमदार सुभाष धोटे ,माजी आमदार ऍड. संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे ,माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे,काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष रंजन लांडे ,भाजप कमिटीचे तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे,अरुण मस्की यांनी केले.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...