आजच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार वेळेवर होत नाही. महिनाभर मेहनत करून, काबाड कष्ट करून हक्काचे पैसे मिळायला त्यांना उशीर होतो. परंतु एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेले कष्ट त्यांची मेहनत लक्षात घेऊन त्यांना बीएमडब्ल्यू BMW कार ही भेट म्हणून दिली आहे. जागतिक सॉफ्टवेअर सेवा कंपनी किसफ्लोच्या (Kissflow) CEO ने कंपनीच्या पाच वरिष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांना त्यांच्या निष्ठा आणि वचनबद्धतेचा सन्मान म्हणून BMW 530d कार भेट दिल्या आहेत. या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या वाढीसाठी दिलेल्या योगदानामुळे तसेच कोविड 19 च्या काळात कंपनीला दिलेली भक्कम साथ यासाठी किसफ्लोने आपल्या पाच कर्मचार्यांना ही भेट दिली आहे.
कंपनीने या कार बक्षिस देण्याची माहिती गुप्त ठेवली होती. कार कर्मचाऱ्यांना देण्याचा सोहळा गुप्त ठेवण्यात आला होता. कार वितरण समारंभाच्या काही तास आधी या कर्मचाऱ्यांना एक महागडी आलिशान कार घेणार असल्याचे सांगण्यात आले. किसफ्लो इंकचे सीईओ सुरेश संबंदम यांनी सांगितले की, कार गिफ्ट मिळवणारे अतिशय नम्र आणि प्रतिभावान आहेत. त्यांना कंपनीत सामील होण्यापूर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
कंपनीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचाही सामना करावा लागला आणि कोविड-19 महामारीच्या काळात काही गुंतवणूकदारांनी कंपनीच्या यशस्वी कारभाराबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. हा कठीण काळ होता. महामारीच्या काळात, गुंतवणूकदारांना खात्री नव्हती की ही कंपनी टिकेल. आज आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही गुंतवणूकदारांना पैसे परत केले आहेत आणि आता पूर्णपणे खाजगी मालकीची कंपनी बनली आहे.