LPG Gas Price Cylinder Hike  
ताज्या बातम्या

व्यावसायिक LPG Gas सिलेंडर आजपासून 115 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नव्या किमती

Published by : Siddhi Naringrekar

वाढत्या महागाईची झळ आता जास्तच वाढत चालली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅससह बहुतांश जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने राज्यातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता एलपीजीच्या दरांत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे.आज (मंगळवार) 1 नोव्हेंबर 2022 पासून 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पण, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमत स्थिर पाहायला मिळत आहे.

सरकारनं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहेमुंबईत 1844 मध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होते, ते आता 1696 रुपयांना मिळणार आहेत. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे, आज 1 नोव्हेंबर 2022 रोजी एलपीजीच्या दरांत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 'या' दिवशी येणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम