ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. महागाई वाढतच चालली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे.
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत मोठी वाढ केली आहे. 19 किलोचा सिलेंडर 209 रुपयांनी महागला आहे. मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी 1684 रुपये आकारले जाणार आहे.