Cold Wave 
ताज्या बातम्या

मुंबई शहर, उपनगरांत थंडीच्या कडाक्याला सुरुवात

दोन – तीन दिवस मुंबईतील वातावरण तसेच राहणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मुंबई शहर,उपनगरांत थंडीच्या कडाक्याला सुरुवात

  • कुलाब्यात किमान तापमान 23.2 अंशांवर

  • सांताक्रूझमध्ये 20.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

मुंबई शहर, उपनगरांत थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या मुंबईत कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने चढ उतार सुरू आहे. त्यामुळे कधी पहाटे गारवा असतो तर दिवसा उकाडा जाणवतो.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी 33.3 तर सांताक्रूझ केंद्रात 34.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. सांताक्रूझमध्ये 20.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा 12 अंशाखाली घसरला असून पुढील दोन – तीन दिवस मुंबईतील वातावरण तसेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Latest Marathi News Updates live: मतदानात महिलांची टक्केवारी वाढली

CBSE Board Exam 2025: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Herbal Tea During Pregnancy: गरोदरपणातील हर्बल चहा ठरेल बाळ आणि बाळंतीणीच्या आरोग्यासाठी वरदान

Latest Marathi News Updates live: मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मविआ नेत्यांची बैठक

शरीरातील नैसर्गिक वेग म्हणजे काय? जाणून घ्या वेगाचे 13 प्रकार