थोडक्यात
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात घट
उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह 5 दिवस कायम राहण्याचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्यात येत आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात घट झाल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर महाराष्ट्रात तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी 14.6 अंश सेल्सिअसची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस पारा 15अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाने वर्तवला आहे.