मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' येथे मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारी देखील राज्य शासन करत असल्याचे देखिल त्यांनी सांगितले.