नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्याने सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वाहनांमधील सीएनजीचा वापर 9 वरून 10 टक्के कमी झाला आहे, तर पूर्वी हे प्रमाण 16 टक्के होते. रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्यामुळे गेल्या वर्षभरात सीएनजीच्या किमती 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
सीएनजीचे दर 70 हून अधिक टक्क्यांनी वाढले आहेत. 1 ऑक्टोबर 2021 पूर्वी राजधानी दिल्लीत CNG 45.5 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होता. मात्र आता सीएनजी 78.61 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. म्हणजेच 14 महिन्यांत सीएनजी 33.11 रुपये प्रति किलो म्हणजेच 73 टक्क्यांनी महागला आहे.
नैसर्गिक गॅसच्या किमतीत मोठा वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे, परिणामी सीएनजी गाड्यांचा वापर कमी झाला आहे.