ऐन सणासुदीच्या काळात महागाईच्या सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.सिटी गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लि. सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांनी वाढ केली आहे.याशिवाय, पाइप्ड कुकिंग गॅसच्या किमतीत प्रति युनिट 4 रुपये वाढ करण्यात आली आहे. सोमवारी म्हणजेच आज हे मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील.
त्यामुळे मुंबईतील वाहनांसाठी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची किरकोळ किंमत 86 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याच वेळी, घरगुती पीएनजीची किंमत प्रति एससीएम 52.50 रुपये असेल.सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने म्हटले आहे, की सरकारने १ ऑक्टोबरपासून गॅसच्या किंमती ४० टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे. असे कारण यावेळी त्यांनी सांगितले आहे.
1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतींमध्ये 40 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी 1 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये 110 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सरकार वर्षातून दोनदा 1 एप्रिल आणि 30 सप्टेंबर रोजी गॅसच्या किंमतींमध्ये सुधारणा करते.