महागाईने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. मुंबई महानगरात पुन्हा एकदा ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’च्या दरात मोठी वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबई महानगरात सीएनजी आणि पीएनजीच्या प्रतिकिलो दरात अनुक्रमे तीन रुपये ५० पैसे आणि एका रुपया ५० पैसे वाढ केली आहे.
आज, ५ नोव्हेंबरपासून हा दर लागू होईल. त्यामुळे सीएनजीचा नवा दर प्रतिकिलो ८९ रुपये ५० पैसे आणि पीएनजीचा ५४ रुपये एवढा झाला आहे.४ ऑक्टोबरला सीएनजीच्या दरात पुन्हा ६ रुपयांची आणि पीएनजीच्या दरात ४ रुपयांची वाढ केली गेली. परिणामी सीएनजीचा दर ८६ रुपये तर पीएनजीचा दर ५२ रुपये ५० पैसे झाला होता.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नैसर्गिक वायूच्या दरात झालेली वाढ आणि केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ पासून केलेली ४० टक्के वाढ यामुळे ही किंमतवाढ करावी लागत असल्याचे ‘महानगर गॅस’ने म्हटले आहे.
नवा दर
सीएनजी : ८६ ८९.५० रु.
पीएनजी : ५२.५० ५४ रु.