भाजपला (BJP) सोडलं म्हणजे हिंदुत्व (Hinduism) सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, भाजपने काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलं का असा सवाल आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाईन संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
कोल्हापुरच्या विकासाठी आम्ही अर्थसंकल्पातही निधी दिला असून, कोल्हापुरच्या वेगवेगळ्या विकासकामांसाठी आम्ही प्रयत्न केला असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोल्हापूरमध्ये असणाऱ्या तलावांची कामं देखील सुरु केली असून, पंचगंगेला स्वच्छ करण्यासाठी देखील काम करत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
फडणवीसांनी काल सभा घेतली, ते म्हणाले आधी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसयाचा मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की आजंही हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत, इतर काही लोकांनी हिंदू हृहयसम्राट होण्याचा प्रयत्न केला, त्यांना लोकांनी झिडकारून लावलं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेने जन्माला आल्यापासून, कधीच आपला झेंडा, नेता आणि विचार बदलला नाही. तुमच्या किती होर्डींगवर अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसंच पुढे ते म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीला फक्त पंतप्रधानांचाच फोटो असतो. सरपंच पदाच्या निवडणुकीलाही तोच अन् दुसऱ्या निवडणुकांनाही तोच फोटो, त्यामुळे पंतप्रधान आहे की सरपंच समजत नाही असा टोला ठाकरेंनी लगावला.