एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा संप एस टी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलेला आहे. संप मिटल्याने लाखो प्रवाशांचा जीव भांड्यात पडलेला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यस्थि मार्गी लागल्याच पाहायला मिळत आहे.
एस टी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून हा संप पुकारलेला होता आणि त्यांच्या या संपाचा फटका लालपरीने जे प्रवास करतात त्या सामान्य लोकांना बसतं होता. तर काही दिवसांवर गणेश चतुर्थी असल्याने ज्यांनी आधीच बुकींग केली होती त्यांना या संपाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तावली जात होती. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे, एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे.
तर या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यांना साडेसहा रुपये बोसिक पगारामध्ये वाढ दिली जाणार आहे आणि या महिन्यापासून ही वाढ लागू होईल म्हणजेच ऑक्टोबरमध्ये जो पगार येईल तो त्या पगारात वाढ दिसणार आहे. यावर आता एस टी कर्मचाऱ्यांची काय भूमिका येते याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे. तर हा संप मागे घेतल्यामुळे लालपरीची चाक पुन्हा एकदा रस्त्यावर फिरताना दिसणार आहेत.