ताज्या बातम्या

CM Shinde On Uddhav Thackrey | उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार उत्तर

Published by : Team Lokshahi

उद्धव ठाकरेंच्या अमित शाहांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार उत्तर दिल आहे. मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीचे उंबरठे झिजवणं ही भीकच असते. मुख्यमंत्री शिंदेंकडून ट्वीट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यात आलेला आहे. कोर्टाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यापेक्षा कोडगेपणा नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते. वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही. लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे. कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी? राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्ताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, हे ध्यानात ठेवा.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावे. बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला. तुम्ही तुमच्या शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले... ते आधी लोकांसमोर कबूल करा.

Dilip Walse Patil | Rohit Pawar : दिलीप वळसे पाटील पवारांना भेटण्याची शक्यता?Vidhan Sabha Election

Jarange Patil On Narhari Zirwa l नरहरी झिरवाळांचं बेमुदत आंदोलन; पहा काय म्हणाले जरांगे पाटील ?

Saptshrungi Mata: सप्तश्रृंगी मातेच्या चरणी तब्बल इतक्या महिलांना घडवले देवीचे दर्शन

Desi cow declared as 'Rajyamata- Gomata' | देशी गाय 'राज्यमाता- गोमाता' म्हणून घोषित

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर