ताज्या बातम्या

2014 मध्ये होते ते 2024 मध्ये दिसणार नाही; मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच नितीश यांचा निशाणा

बिहारमध्ये झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Published by : Sudhir Kakde

बिहारमध्ये झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच नितीश कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 2014 मध्ये येणारे 2024 मध्ये राहणार का? आम्ही असो किंवा नसो, ते 2024 मध्ये राहणार नाहीत असं म्हणत नितीश कुमारांनी भाजपला खूलं आव्हान दिलं आहे. भाजपसोबतची युती तोडण्याबाबतही नितीशकुमार उघडपणे बोलले. ते म्हणाले, गेल्या दीड महिन्यांपासून आमच्यात कोणत्याही प्रकारचा संवाद नव्हता. जे घडत होतं ते चुकीचं होतं. भाजपसोबत गेल्यानं आमचं नुकसान झालं असंही ते म्हणाले आहेत.

नितीश कुमार म्हणाले की, आमच्या पक्षाचे सर्व लोक भाजप सोडा, असं सांगत होते. त्यामुळे अखेर आम्ही हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानपदाच्या दाव्याबाबत ते म्हणाले की, हे सर्व सोडा. काही लोकांना विरोध संपेल असं वाटतंय. मात्र आता आम्हीही विरोधात आलोय. संपूर्ण विरोधकांनी एकजुटीनं पुढे यावं आणि योजना तयार करावी अशी आमची इच्छा आहे. 2014 मध्ये या लोकांना बहुमत मिळालं होतं, पण आता 2024 येत आहे असं म्हणत नितीश कुमार यांनी आपली आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली आहे.

अटलजींना आठवत नितीश यांनी मोदींवर सोडलं टीकास्त्र

पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार म्हणाले की, आम्ही त्यांना पाठिंबा दिला, पण जेडीयूला संपवण्यासाठी त्यांच्या वतीने प्रयत्न सुरू झाले. त्यामुळेच आम्ही त्यांची साथ सोडली. वाजपेयी आणि मोदी यांच्यात काय फरक आहे, असं विचारले असता नितीशकुमार म्हणाले, मी अटलजींवर खूप प्रेम करतो. आम्ही त्यांना विसरू शकत नाही. त्यावेळची गोष्ट वेगळी होती. अटलजींचं आणि त्यावेळच्या लोकांचे प्रेम विसरता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला काहीही बोलायचं नाही. आम्ही एक माणूस दिला होता, तो त्यांचा झाला. असं म्हणत त्यांनी थेट आरसीपी सिंह यांच्यावर निशाणा साधला.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड