निसार शेख|रत्नीगिरी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत तब्बल दीड तास उशीराने आले. मुख्यमंत्री येणार म्हणून कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मारूती मंदिर चौकात ताटकळत उभे होते.अखेर पाऊण वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले.
रत्नागिरीतील तारांगणाचे उद्घाटन आणि इतर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरीत दौरा होता.सकाळी अकरा वाजता ते रत्नागिरी विमानतळावर उतरणार होते मात्र साडेबारा झाले तरी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले नव्हते. अनेक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मारूती मंदिर चौक येथे ताटकळत उभे होते. अखेर पाऊण वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मारूती मंदिर चौकात पोहचले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळावरून मारूती मंदिर कडे रवाना होताच मारूती मंदिर चौकातील वाहतूक बॅरिकेटस् लावून रोखण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री मारूती मंदिर येथे येऊन जाई पर्यंत वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.