CM Eknath Shinde 
ताज्या बातम्या

"हिंदू हिंसक आहेत", राहुल गांधींच्या वक्तव्याचा CM शिंदेंनी घेतला समाचार, म्हणाले; "हिंदू समाज योग्यवेळी..."

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जिव्हाळ्याने सुरु केली आहे. महिलांना वर्षाला १८ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे, यासाठी एक व्यापक विचार ठेऊन आम्ही ही योजना सुरु केली"

Published by : Naresh Shende

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : वारीमध्ये राहुल गांधीही चालणार आहेत, याच हिंदू धर्माविषयी त्यांनी वक्तव्य केलं होतं, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, विशिष्ट लोकांना खूश करण्यासाठी राहुल गांधी यांनी तमाम हिंदूंचा अपमान केला आहे. हिंदू हिंसक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे हिंदू हा सहिष्णू आहे. हिंदू संयमी आहे. देशात कोणत्याही विचाराचा, कोणत्याही पक्षाचा हिंदू राहुल गांधींना कधीही माफ करणार नाही. तो संयमी आणि सहिष्णू जरूर आहे. पण जो कोणी त्याचा अपमान करेल, त्याचा बदला हा हिंदू समाज योग्यवेळी नक्की घेईल, असा मला विश्वास आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली.

माध्यमांशी संवाद साधताना शिंदे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जिव्हाळ्याने सुरु केली आहे. महिलांना वर्षाला १८ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे, यासाठी एक व्यापक विचार ठेऊन आम्ही ही योजना सुरु केली. त्यासोबत तीन सिलेंडर, जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात, अशा दोन योजन महिलांसाठी आम्ही सुरु केल्या. अतिशय जिव्हाळ्यापोटी या योजना आम्ही सुरु केल्या आहेत. त्याचा लाक्ष महिला भगिनींना प्रत्यक्ष मिळाला पाहिजे. त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची कुठेही कुंचंबना होऊ नये, तसच त्यांच्याकडून कुणीही पैशांची मागणी करता कामा नये, अशा सर्व सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत. शासनाने ज्या आत्मियतेने या योजना सुरु केल्या आहेत, त्याचा लाभ महिला भगिनींना प्रत्यक्ष मिळाला पाहिजे. यामध्ये कुणीही बेजबाबदारीनं काम केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

सरकारने वारीतील वाहनांना टोलमाफी केली आहे, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, आषाढी वारी सुरु आहे. मी नेहमीच सांगतो, हे सरकार शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला भगिनी, कामगार, ज्येष्ठ-युवा या सर्वांचं आहे. यामध्ये वारकरी सांप्रदायदेखील मोठा आहे. आज वेगळ्या आनंदात उत्साहात पांडूरंगाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी जातात. स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे. यासाठी आम्ही सर्व सोयी-सुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय. प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचसोबत त्यांचा ग्रुप इन्शूरन्सही आम्ही काढलेला आहे आणि टोलमध्येही त्यांना सूट दिलेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिन्याला दीड हजार आणि वर्षाला १८ हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तीन गॅस सिलेंडर देण्यासह मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरु केली आहे. १ जुलैपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. याची प्रक्रिया जुलै किंवा ऑगस्टमध्ये पूर्ण झाली, तरीही पैसे जुलैपासूनच मिळणार आहेत. विरोधी पक्ष काय बोलतो, त्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. आम्ही त्यांच्या आरोपाकडेही लक्ष देत नाहीत.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश