ताज्या बातम्या

“अनेक लोकांनी विरोध केला, अडथळे आणले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची आज ट्रायल पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ चा शुभारंभ झाला. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला आणि सारिपूत ते मरोळ अशी तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला.

Published by : Siddhi Naringrekar

वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची आज ट्रायल पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ चा शुभारंभ झाला. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला आणि सारिपूत ते मरोळ अशी तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला.

त्याठिकाणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. “आज आपण पाहतो आहे की तो संपूर्ण महामार्ग पूर्णत्वास जातोय. आपण लवकरच नागपूर ते शिर्डी या महामार्गाचं उद्घाटन करतो आहे. असे अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र, त्यात अनेक विघ्नं आली. उद्या विघ्नहर्ता गणरायाचं आगमन होत आहे. अश्विनी भिडेंनी बरोबर योग साधून आज हिरवा झेंडा दाखवला. विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही.” असे शिंदे म्हणाले.

तसेच “फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक कामं सुरू झाली. तसेच पाच वर्षात या प्रकल्पांनी मोठी प्रगती केली. मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उदाहरण मी देईन. मला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आपल्याला हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला. अनेकांनी अडथळे आणले,” “प्रदुषण कमी होईल, साडेसहा लाख वाहनांची संख्या कमी होईल, १७ लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील, वेळ वाचेल, साडेतीन लाख लिटर इंधन वापर कमी होईल. याचा खूप मोठा फायदा आहे, असेसुद्धा मुख्यमंत्री म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, “युतीचं सरकार येऊन आज दोन महिने झाले आहेत. ३० तारखेलाच शपथविधी झाला होता. आम्हाला या बहुचर्चित मेट्रो चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे आभार मानतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, या कामावरील स्थगिती उठवली पाहिजे आणि दीर्घकाळ प्रलंबित हा प्रकल्प पुढे नेण्याचा आम्ही निर्णय घेतला.”असंही शिंदेंनी सांगितले.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news