कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यावर राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले की, चांगल्या कामांना विरोध करणे हा दुप्पटीपणा आहे.विरोधाला विरोध म्हणून विकासाला विरोध करु नका. उद्धव ठाकरे यांनीच या प्रकल्पासाठी पत्र दिले होते. आता तेच याला विरोध करत आहेत. असे शिंदे म्हणाले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, काहीजणांनी नागरिकांची डोकी भडकवली. समृद्धी महामार्गालाही असाच विरोध झाला. आम्ही महामार्ग पूर्ण केला. तसाच कोकणातील रिफायनरी प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत.कोकणातील रिफायनरी प्रकल्प रेटून नेणार नाही. बारसू येथील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. स्थानिकांच्या संमतीनेच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.