CM Eknath Shinde Lokshahi
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde: "...शिवभक्त हे सहन करणार नाहीत"; नकली वाघनखं म्हणणाऱ्यांना CM एकनाथ शिंदेंनी दिला इशारा

Published by : Naresh Shende

CM Eknath Shinde Speech : शेकडो मैल प्रवास करत ही वाघनखं आज इथे पोहोचली आहेत. या मराठी भूमीत ही वाघनखं दाखल झाली आहेत. सुधीर भाऊंनी लंडनला जाऊन एओयू केला. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्यूझियमसोबत करार दिला. त्यामुळे आपण याची देही, याची डोळा असं दर्शन आपल्याला होऊ शकलं. काही लोकं या वाघनखांवर शंका उपस्थित करत आहेत. हे दुर्देवं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्यावर चाल करून आला त्या अफजल खानाचा कोथळा काढला. ही वाघनथं इतके आल्यावर सर्वांना अभिमान आणि गौरव वाटला पाहिजे. पण काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं. चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं. वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने शिवरायांच्या शोर्याचा, पराक्रमाचा, वीरतेचा अपमना केल्यासारखा आहे. शिवभक्त कदापी हे सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकली वाघनखं म्हणणाऱ्यांना दिला आहे. ते साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या भव्य सोहळ्यात बोलत होते.

शिंदे शिवप्रेमींना संबोधीत करताना म्हणाले, आज प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या दृष्टीने भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. तमाम मराठी मनं सुखावली आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळाला आहे. अनेक वर्षांपासून आपण या दिवसाची वाट पाहत होतो. सुधीर भाऊंना धन्यवाद द्यायला पाहिजे. तुम्ही अगदी वेळेवर ही वाघनखं आणली आहेत. सरकारने दिलेला शब्द तुम्ही पाळला आहे. या वाघनखांचं प्रत्यक्ष दर्शन आपण आता घेत आहोत. शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वाघनखं म्हणजे महाराष्ट्राची शान..

आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. डोळ्यात प्राण आणून आपण या क्षणाची वाट पाहत होतो. तो क्षण अखेर आला आणि वाघनखांचं दर्शन झालं. उद्यापासून सर्व शिवप्रेमींना फक्त वाघनखांचं दर्शन नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोर्याचं, पराक्रमाचं, शूरतेचं, वीरतेचं दर्शन होणार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून इथे आलो नाही. तर आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आलो आहोत, असंही शिंदे म्हणाले.

Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध

Navratri 2024: माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु

Navratri 2024: जाणून घ्या नवरात्रीमध्ये लावण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिमागे काय आहे कारण...

IND vs BAN: पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा केला 280 धावांनी पराभव; मालिका 1-0 ने जिंकली

Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर