Eknath Shinde 
ताज्या बातम्या

"...आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल", मुंबईतील दरडींच्या समस्यांवर CM एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

मुंबईला दरडमुक्त करण्याचा आमचा टार्गेट आहे, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

Published by : Naresh Shende

Eknath Shinde On Landslide In Mumbai : ज्या ठिकाणी दरडी कोसळू शकतात, त्या भागाचा सर्वे करून तिथे सेफ्टी नेट्स लावल्या पाहिजे. असल्फा येथील हनुमान टेकडीजवळ पायोनियर कंपनीने काम सुरु केलं आहे. हे काम पूर्ण होत आहे. हे अत्याधुनिक पद्धतीचं काम आहे. मुंबई-पुणे एस्क्प्रेसवेवर दरडी कोसळली, त्यावेळी अशा पद्धतीने काम केलं होतं. स्वीस टेक्नॉलॉजी यासाठी वापरण्यात येत आहे. २००१ मध्ये याठिकाणी दरड कोसळली होती आणि ७२ लोकांचा मृत्यू झाला होता. मुंबईत अशा अतिधोकायक ३१ ठिकाणी तपासणी केली आहे. यासाठी काम सुरु राहिल. मुंबईत ज्या ठिकाणी अशआप्रकारच्या दरडी कोसळू शकतात, त्याठिकाणी सेफ्टी नेट्स लावल्यावर हे सर्व थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मुंबईला दरडमुक्त करण्याचा आमचा टार्गेट आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेकडून डोंगराळ भागात राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा बजावल्या जातात. आमचं कायमस्वरुपी स्थलांतर प्रशासनाने करावं, अशी मागणी नागरिक करतात, पण दरवर्षी हा पेच पुन्हा राहतो, यावर प्रतिक्रिया एकनाथ शिंदे म्हणाले, दरडी कोसळू नयेत यासाठी ही पहिली सुरुवात आहे. कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी मुंबई महापालिका नक्कीच विचार करेल. कोणत्याही गोष्टींपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाच आहे.

त्यासाठी काही नियम, अटी-शर्थी, पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता लागल्यास राज्य सरकार नक्की करेल. हा प्रयोग मुंबई पहिल्यांदा होत आहे. अत्याधुनिक सेफ्टी नेट्सच्या माध्यमातून लँडस्लाईड थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. इथे हजारो लोक राहतात. याठिकाणी धोका निर्माण होऊ नये, यासाठी आफण सेफ्टी नेट्स या डोंगराला लावतो. मुंबईत पाणी टंचाई होणार नाही. यावेळी चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. ज्या इमारती धोकादायक झाल्या आहेत, त्यासाठी सरकार पॉलिसी बनवत आहे, असंही शिंदे म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश