Eknath Shinde 
ताज्या बातम्या

'माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई - CM एकनाथ शिंदे

Published by : Naresh Shende

चेतन ननावरे

CM Eknath Shinde On Mazi Ladaki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे, या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्याचं निदर्शनास आल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत.

फॉर्म भरुन देण्याचं निमित्त करुन कुणी गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई केली जाईल. एखाद्या कार्यालयात असे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखांवर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही शिंदे म्हणाले. योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे, या कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच योजनेचा फॉर्म भरणे, या प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोल्हापुरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं आंदोलन

Rohini Khadse : मला माझं तिकीट कन्फर्म आहे एवढे माहित आहे; मला पक्षाने आदेश दिलेलं आहेत, तुम्ही कामाला लागा

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक प्रकरण; आरोपींवर एफआयआर दाखल

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना; पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

ललित पाटील ड्रग्स प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू