Aditya Thackeray - Eknath Shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

आदित्य ठाकरे-एकनाथ शिंदेंमध्ये मतभेद? नाराजी नाट्याचा नवा अध्याय

विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण

Published by : Sudhir Kakde

विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाविकास आघाडीचे ६ आणि भाजपचे ५ अशा ११ उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगली आहे. मुख्य म्हणजे भाई जगताप प्रसाद लाड यांच्यातच हा सामना होणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपने सर्व तयारी केली आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे सुरु झाल्याचं बोललं जातंय. मंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. आमदारांना मार्गदर्शन करतांना नेतृत्वाने उपस्थित राहण्याची अवश्यता असल्याची शिंदे यांची भूमिका होती, त्यावरुन हा वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येतंय.

हॉटेल वेस्ट ईन या हॉटेलमध्ये आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी आज आदित्य ठाकरे यांनी आमदारांना मार्गदशन केल्यानं शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. तर अंतर्गत मतभेद शिवसेनेत नसल्याची स्पष्टता खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर आपण बोलणार नसल्याची माहिती दिली. "कुणाच्या अंतर्गत वादात मी बोलणार नाही. तिन्ही पक्षामध्ये मतभेद आहेत, कुणाचाही कुणामध्ये मेळ नाही. आपला निवडून येईल यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. जो असंतोष आहे, त्याला वाट मिळाली पाहिजे, आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. ही निवडणूक संभव आहे असंभव नाही असंही पुढे फडणवीस.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या 20 तारखेला 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार आहे. मात्र आता शिवसेनेत जर खरंच असे मतभेद निर्माण होत असतील, तर राज्यसभेत महाविकास आघाडीला धोबीपछाड देणाऱ्या भाजपशी भिडणं कठीण होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका